बातम्या December 2023

Speaking to Indian Masterminds, the 2019-batch IAS officer of Maharashtra cadre, Ms. Minal Karanwal, who is now posted as CEO, Zila Parishad, Nanded, gave details about the model which is now being rolled out in the entire state of Maharashtra.

गावस्तरावरील कर्मचाऱ्यांची हजेरी आता क्यूआर कोडद्वारे

स्वतःच्या इमारती नसलेल्या 528 अंगणवाडी केंद्र आता शाळेच्या परिसरात स्थलांतरित – मीनल करनवाल

नांदेड : डॉ. संजय तुबाकले आकाशवाणीवर

जिल्ह्यात स्वच्छतेसाठी विशेष अभियान 22 डिसेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन

आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात मा. सीईओ मीनल करनवाल यांची बाईट

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नांदेड जिल्ह्याचे एकूण २२ लक्ष लाभार्थी असून, आजपावेतो २७ टक्के लाभार्थीचे ऑनलाइन कार्ड तयार आहेत. या योजने अंतर्गत एकूण १३०० व्याधी/रोगांवर अंगीकृत खाजगी रुग्णालयात उपचार मिळणार आहेत. एकूण ५ लक्ष पर्यंतचा प्रति कुटुंब होणारा hospitalization चा खर्च शासनाकडून विमा संरक्षित असणार आहे, त्यामुळे अशा लाभार्थ्याना प्रति कुटुंब प्रती वर्ष ५ लक्ष admit झालेल्यानंतर दवाखाना खर्चमोफत होणार आहे. आजारांपणावरील खर्च वाढल्यामुळे कर्जबाजारीपणा वाढून गरीबीच्या खाईत लोटण्याचे प्रमाण या योजनेने कमी होणार आहे. सर्व केशरी, पिवळे व पांढरे कार्ड धारक कुटूंब यात लाभार्थी आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थींनी आपले कार्ड ऑनलाइन पद्धतीने आयुष्मान ऍप वापरून किंवा जवळच्या सीएससी केंद्र, आशा, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडून काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मा. सीईओ मिनल करनवाल यांनी केले आले.

शिक्षकांसाठी वेध प्रशिक्षण यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करनवाल यांनी दिलेली बाईट

जवळगाव व हाडोळी ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून प्रथम पुरस्कार

मुलींच्या सक्षमीकरणासह मुलींना लखपती बनवणाऱ्या लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा – मीनल करनवाल यांचे आवाहन

मुलींच्या सक्षमीकरणासह मुलींना लखपती बनवणाऱ्या लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा मीनल करनवाल यांचे आवाहन

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा यंदा जानेवारी 2023 मध्ये

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जानापुरी ग्रामपंचायतीस भेट

कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक लाभासाठी जिल्हा परिषदेत विशेष मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती

हक्काच्या लाभासाठी विश्वासाने पुढे या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा परिषदेत जागतिक दिव्यांग दिन संपन्न

आता ग्राम पंचायतस्‍तरावर निवडले जाणार नल जल मित्र

अभ्यागतांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेत टाईम बाउंड कार्यक्रम; दोन महिन्यात 151 प्रकरणे निकाली

मिनल करनवाल यांनी शिक्षण विभागातील प्रलंबित गट विमा योजना, सेवानिवृत्तीचे लाभासह विविध प्रश्न निकाली काढले

जागतिक शौचालय दिनाच्‍या औचित्‍याने जिल्‍हयात स्‍वच्‍छता उपक्रम

राष्ट्रीय पोषण कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या त्रस्तयंत्रणेकडून जल जीवन मिशनच्या कामाच्या तपासणीनंतर उत्कृष्ट दर्जा प्राप्त

जल जीवन मिशन अंतर्गत कामांचे केंद्रीय पथकांकडून कौतुक; कामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त

प्रेस नोट
दिनांक 4 नोव्हेंबर 2023

जल जीवन मिशन अंतर्गत कामांचे केंद्रीय पथकांकडून कौतुक कामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त

नांदेड,4- जिल्हा परिषद नांदेडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या कामांना नुकतेच जलशक्ती मंत्रालयामार्फत श्री संजीव कुमार बोरडोलोई (आसाम) व श्रीमती विनिता (केर आदी सदस्य पथकांनी जिल्ह्यातील एकूण 16 नळ पाणीपुरवठा योजनांची पाहणी करून आपला अभिप्राय केंद्र शासनास सादर केला. त्यात प्रामुख्याने कामांचा दर्जा, गुणवत्ता, साहित्य तपासणी अहवाल, काँक्रीट टेस्ट अहवाल, पाईपाचे थर्ड पार्टी अहवाल, पाणी गुणवत्ता चाचणी अहवाल, टाटा कन्सल्टन्सी त्रयस्त यंत्रणे कडून कामांची झालेली तपासणी करून दिलेला अहवाल, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती झालेल्या संवाद, कामांची रंगरंगोटी, कार्यात्मक नळ जोडणी, स्त्रोतांचे उद्भव या सर्व बाबींचे सविस्तर पाहणी करून केंद्र शासनास अहवाल पाठवला आहे. कामांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांचे कौतुक केले आहे.
नांदेड जिल्ह्याला कार्यात्मक नळ जोडणीचे एकूण 5 लाख 36 हजार 341 इतके उद्दिष्ट असून आत्तापर्यंत 3 लाख 81 हजार 981 इतके उद्दिष्ट साध्य झाले आहे. शिल्लक 1 लाख 54 हजार 360 इतके उद्दिष्ट साध्य करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अमोल पाटील हे जिल्ह्यातील सर्व अभियंते, सर्व कंत्राटदार, वँपकॉस कंपनीकडील सर्व अभियंते यांच्या बैठका घेऊन युद्धपातळीवर कामे हाती घेतले आहेत. येत्या 26 जानेवारी 2024 पर्यंत 100% नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सूक्ष्म नियोजन केले आहे. तसेच योजनेच्या कामांकरिता नामांकित व मजिप्रा मान्यता प्राप्त पाईप, योग्य खोली, योजनांची रंगरंगोटी, दर्जा उत्तम राखण्यात येत असून या कामी वँपकॉस कंपनी व टाटा कन्सल्टन्सीचे थर्ड पार्टी अहवालाकरिता जिल्ह्यातील अभियंत्यांची योग्य समन्वय ठेवून कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. येत्या सहा महिन्यात आणखी गती वाढवून सूक्ष्म नियोजनाद्वारे जलजीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.

घनकचरा व्यवस्थापन या विषयासंदर्भातली चित्रफीत आहे. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती बैठक, जल व्यवस्थापन बैठक, पंचायत समिती सर्व मासिक सभा, ग्रामसेवक मासिक सभा, अंगणवाडी सेविका मासिक सभा, मुख्य सेविका मासिक सभा, आरोग्य विभागाच्या सर्व सभा, आशा वर्कर बैठका, महिला बचत गट तालुका स्तरावरील बैठका, गावातील सर्व बचत गट बैठका, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसभा, वार्डसभा यामधून ही चित्रपट दाखवण्यात यावी.

स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी १ तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान यासाठी मा. सीईओ मिनल करनवाल करनवाल मॅडम यांचे आवाहन.

स्वच्छता हीच सेवा या अभियानात “श्रमदान” विशेष मोहीम राबविण्यात येणार …मीनल करणवाल

जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी स्वच्छतेसाठी महा श्रमदान

नागरिकांनी सहभागी होऊन कचरा मुक्त गाव व कचरा मुक्त शहर कराण्यासाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Biogas plant of Khadkut village contributes to a healthier lifestyle

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त #मेरीमाटीमेरा_देश अभियान स्वयंस्फूर्त उत्साहात साजरे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे सर्व नागरिकांना आवाहन.

24 ऑगस्‍ट पर्यंत सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनाची कामे पूर्ण करा- सीईओ मीनल करनवाल