जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, ऑल्मिपिक असोसिएशन, नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना (सर्व) यांच्या संयुक्त विदयमाने आज दिनांक २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातून रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी आदींची उपस्थित होती.