आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात मा. सीईओ मीनल करनवाल यांची बाईट
आयुष्मान भारत जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नांदेड जिल्ह्याचे एकूण २२ लक्ष लाभार्थी असून, आजपावेतो २७ टक्के लाभार्थीचे ऑनलाइन कार्ड तयार आहेत. या योजने अंतर्गत एकूण १३०० व्याधी/रोगांवर अंगीकृत खाजगी रुग्णालयात उपचार मिळणार आहेत. एकूण ५ लक्ष पर्यंतचा प्रति कुटुंब होणारा hospitalization चा खर्च शासनाकडून विमा संरक्षित असणार आहे, त्यामुळे अशा लाभार्थ्याना प्रति कुटुंब प्रती वर्ष ५ लक्ष admit झालेल्यानंतर दवाखाना खर्चमोफत होणार आहे. आजारांपणावरील खर्च वाढल्यामुळे कर्जबाजारीपणा वाढून गरीबीच्या खाईत लोटण्याचे प्रमाण या योजनेने कमी होणार आहे. सर्व केशरी, पिवळे व पांढरे कार्ड धारक कुटूंब यात लाभार्थी आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थींनी आपले कार्ड ऑनलाइन पद्धतीने आयुष्मान ऍप वापरून किंवा जवळच्या सीएससी केंद्र, आशा, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडून काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मा. सीईओ मिनल करनवाल यांनी केले आले.