विभाग प्रस्तावना

ग्रामीण पाणी पूरवठा विभाग, जिल्‍हा परिषद नांदेड हा दिनांक 01.04.1997 पासून कार्यरत झाला आहे. जिल्‍हा स्‍तरावर 01 विभाग, व तालूकास्‍तरावर 07 उप विभाग, आहेत. विभागा अंतर्गत 01 कार्यकारी अभियंता, 01 उप कार्यकारी अभियंता, 07 उप अभियंता (स्‍थापत्‍य), 02 उप अभियंता (यांत्रिकी), (46) कनिष्‍ठ अभियंते, व 03 भूवैज्ञानिक, पदे मंजूर आहेत

ग्रामीण भागातील जनतेला 40 लिटर प्रति दिन प्रती माणसी शूध्‍द पूरेसे पाणी उपलब्‍ध करुन देणे हा विभागाचा मुख्‍य उध्‍देश आहे. जिल्‍हयात सद्य:स्थितीत (1428) नळ योजना, (1808) विद्युतपंप, (5110) हातपंप, व (1199) सार्वजनिक विहीरी, आहेत. सदर योजनांची देखभाल व दुरुस्‍ती संबधीत ग्रामपंचायत मार्फत केली जाते जिल्‍हयात (2060) वाडी वस्‍ती आहेत.

सद्य:स्थितीत राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्‍हयात 144 पाणी पूरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत . ग्रामपंचायतीच्‍या सहकार्याने जिल्‍हयातील सर्व गावे वाडया तांडयांना पूरेसे शुध्‍द पाणी पूरवठा करण्‍यासाठी विभाग सतत प्रयत्‍नशील आहे

कार्यकारी अभियंता (पापू)

जिल्‍हा परिषद नांदेड