वाहतुक दळणवळण

राष्‍ट्रीय महामार्ग

कल्‍याण-अहमदनगर-पाथर्डी-मजलगाव-परभणी-नांदेड-भोकर-निर्मल आंध्रप्रदेश राष्‍ट्रीय महामार्ग क्र.7 ला मिळणारा राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 222.

प्रमुख राज्‍य मार्गः-

  1. मुंबई-अहमदनगर-बीड-नांदेड-जगदाळपूर(प्र.रा.मा.2)
  2. रत्‍नागिरी-सोलापूर-तुळजापूर-लातूर-नांदेड-हदगाव-यवतमाळ-वर्धा-नागपूर मार्ग (प्र.रा.मा.3)
  3. औरंगाबाद-जालना-परभणी-बसमत-नांदेड-देगलूर (प्र.रा.मा.6)

राज्‍यमार्गः-

  1. शहापूर-संमगनेर-शेवगाव-माजलगाव-पार्थी-पुर्णा-नांदेड-मुदखेड-उमरी-धर्माबाद-बेलूर ब्रीज कंदकुर्ती राज्‍य सीमा (राज्‍य मार्ग क्रमांम 44)
  2. रेणापूर-उदगीर-देगलूर- मार्ग (राज्‍य मार्ग क्रमांक 168)
  3. कन्‍नड-सिल्‍लोड-देऊगावराजा-लोणार-वाशीम-पुसद-महागाव-सारखनी-मांडवी-राज्‍य सीमेपर्यंत (राज्‍य मार्ग  क्रमांक 183)
  4. दारव्‍हा-पुसद-उमरखेड-किनवट (राज्‍य मार्ग 213)
  5. वाटूर फाटा प्र. (राज्‍य मार्ग 6)
  6. कंधार-जांब-उदगीर- मार्ग (राज्‍य मार्ग क्रमांक 222)
  7. लोहा-कंधार-मुखेड-खानापूर-नरंगल-सागरोळी-कारलाफाटा-कोंडलवाडी (राज्‍य मार्ग 223)
  8. नांदेड-उस्‍माननगर-कौठा-मुखेड-मुक्रमाबाद-औराद राज्‍य मार्ग पर्यंत (राज्‍य मार्ग 224)
  9. शिरुर-ताजबंद-मुखेड-नरसी-बिलोली-बोधन ते राज्‍य सीमा (राज्‍य मार्ग 225)
  10. करडखेड-हाणेगाव-मरपल्‍ली ते राज्‍य सीमा (राज्‍य मार्ग 226)
  11. प्रमुख राज्‍य महामार्ग 6 औरंगाबाद-जालना-परभणी-बसमत-नांदेड-देगलूर-ला जोडून आदमपूर-बिलोली-कोंडलवाडी धर्माबाद-मुधोळ ते राज्‍य सीमा पर्यंत (राज्‍य मार्ग 227)
  12. उमरी-बळेगाव-नायगाव (राज्‍य मार्ग 228)
  13. हदगाव-भोकर-उमरी-लोहगाव (राज्‍य मार्ग 229)
  14. मुदखेड-भोकर-किनवट-सारखनी-माहूर-पूसद जिल्‍हा सीमेपर्यंत (राज्‍य मार्ग 230)
  15. चिखली-बोथ राज्‍य सिमेपर्यंत (राज्‍य मार्ग 231)
  16. आर्वी-वर्धा-वायेगाव-राळेगाव-घाटंजी-पारवा-मांडवी रस्‍ता (राज्‍य मार्ग 257)

रेल्‍वेमार्ग

मनमाड-काचिगुडा मार्गः- हा मार्ग जिल्‍हयात कि.मी. क्रमांक 338.28 ते कि.मी. क्रमांक 421.03 पर्यंत जात असून जिल्‍हयातील कि.मी. क्रमांक 333.54 ते 373.40 पर्यंतच्‍या मार्ग नांदेड जिल्‍हयामध्‍ये येतो. त्‍यांनतर कि.मी. 373.40 ते कि.मी. क्रमांक 427.01 पर्यंतचा भाग हैद्राबाद विभागामध्‍ये येतो. म्‍हणजे या मार्गाची नांदेड विभागाची लांबी 93.47 कि.मी. इतकी आहे.
या मार्गावर खालील स्‍थानके आहेत. लिं‍बगाव (338.28 कि.मी.), वाणेगाव (343.0 कि.मी.), नांदेड (349.38 कि.मी.), पाथ्‍रड (359.36 कि.मी.), मुगट (362.61 कि.मी.), मुदखेड (ज) (371.87 कि.मी.), शिरुणगाव (378.03 कि.मी.), सेलगाव (383.85 कि.मी.), उमरी (391.55 कि.मी.), बोलसा (400.00 कि.मी.), करखेली (407.44 कि.मी.), सामराळा (414.61 कि.मी.), धर्माबाद (421.03 कि.मी.) या नंतर हा मार्ग सिकंदराबादकडे जातो. या मार्गावरुन मालाची व प्रवाशांची मोठी वाहतूक होते. महत्‍वाच्‍या स्‍थानकामध्‍ये प्रवाशांसाठी प्रतिक्षा कक्ष, पाण्‍याची व विजेची सोय तसेच शौचालय,उपरहारगृह, प्रवाशांना बसण्‍यासाठी बाके इ. सोयी करण्‍यात आल्‍या आहेत.

मुदखेड-अदिलाबाद मार्गः- मुदखेड-अदिलाबाद हा मार्ग सन 1931 मध्‍ये वाहतुकीस खुला करण्‍यात आला. या मार्गाची जिल्‍हयातील एकूण लांबी 132.74 कि.मी. इतकी आहे. मुदखेड येथून सुरु होऊन हा मार्ग जिल्‍हयात ईशान्‍येकडून नैऋत्‍यकडे जातो. तसेच पुढे हा मार्ग आंध्र प्रदेशामध्‍ये सिकंदराबादकडे जातो. हा मार्ग रुंदमापी करण्‍यात आला आहे. या मार्गावर मुदखेड (0.0 कि.मी.), जांभळी (9.33 कि.मी.), नीमबारी (14.12 कि.मी.), भोकर (21.14 कि.मी.), तेरबन (29.46 कि.मी.), देवठाणा (31.88 कि.मी.), हदगाव रोड (39.10 कि.मी.), पारवा खुर्द (46.65 कि.मी.), जवळगाव (द्र) (49.60 कि.मी.), खडकी बाजार (53.55 कि.मी.), हिमायतनगर (57.37 कि.मी.), जिरोना (87.84 कि.मी.), सहस्‍त्रकुंड (72.41 कि.मी.), महिंबा (79.60 कि.मी.), धानोरा (87.84 कि.मी.), बोधडी बुजर्ग (102.22 कि.मी.), मदनापूर (110.50 कि.मी.), किनवट (116.74 कि.मी.), अंबाडी (124.74 कि.मी.), ही स्‍थानके लागतात. या मार्गावरील सर्व स्‍थानकांवर पिण्‍याचे पाणी, बसण्‍यासाठी बाके, उपहारगृहे, शौचालये इ. सोई उपलब्‍ध केल्‍या आहेत.

रेल्वे वेळापत्रकसाठी येते क्लिक करावे : वेळापत्रक