नांदेड जिल्हा

नांदेड जिल्हा

नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोर्‍यात आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे. आदिलाबाद व निझामाबाद (आंध्र प्रदेश), बिदर (कर्नाटक), यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. नांदेड जिल्हा महाराष्ट्राला (आग्नेय दिशेच्या बाजूने) कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांशी जोडतो.

जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून जिल्ह्याच्या दक्षिण- नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागातून गोदावरी नदी वाहते, हा प्रदेश सपाट व सुपीक आहे. किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामख्याने सागाची व बांबूची वने आढळतात.

गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून, परभणी जिल्ह्यातून वाहत येऊन पुढे ती आंध्रप्रदेशात प्रवेश करते. आसना, सीता, सरस्वती व मांजरा, कयाधू व लेंडी या जिल्ह्यातील इतर नद्या आहेत. मांजरा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून, तर पैनगंगा नदी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. नांदेडजवळची शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी उपसा जलसिंचन योजना प्रसिध्द आहे. हा राज्यातील सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे असे मानले जाते. गोदावरी नदीवरील हा प्रकल्प नांदेडजवळ असरजन या ठिकाणी असून येथील जलाशयास शंकरसागर असे म्हटले जाते.

कंधार तालुक्यातील मन्याड नदीवरील मन्याड, तसेच लेंडी नदीवरील पेठवडज व महालिंगी, मुखेड तालुक्यातील कुंद्राळा,देगलूर तालुक्यातील करजखेड,किनवट तालुक्यातील नाझरी व डोंगरगाव इत्यादी अन्य महत्त्वाची धरणे जिल्ह्यात आहेत.

जिल्ह्यातील हवामान उष्ण, कोरडे असून उन्हाळा फारच कडक असतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ८०० ते १०००मि. मी. पाऊस पडतो, तर पूर्वेकडील व ईशान्येकडील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण वाढत जाऊन तेथे १००० ते १२०० मि. मी. पाऊस पडतो.

जिल्ह्यात एकूण सोळा तालुके आहेत. मुदखेड, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर व नायगाव (खैरगाव) हे नवीन तालुके १९९९ मध्ये अस्तित्वात आले.

नांदेड जिल्‍हा:- सर्वसाधारण माहिती

1 भौगोलिक क्षेत्र 10,33,100 हे
2 एकुण गावांची संख्‍या 1603
3 एकुण लोकसंख्‍या ( 2011) 33,56,566
4 ग्रामीण लोकसंख्‍या 24,42,734
5 नागरी लोकसंख्‍या 9,13,832
6 साक्षरता 76.94
7 तालुके 16
8 पंचायत समिती 16
9 ए.बा.से.यो. प्रकल्‍प 16
10 जि.प.प्राथमिक शाळा 2242
11 जि.प. माघ्‍यमिक शाळा 71
12 अंगणवाडी केंद्र 3010
13 मिनी अंगणवाडी केंद्र 791
14 प्राथमिक आरोग्‍य केंद्र 65
15 प्राथमिक आरोग्‍य उपकेंद्र 377
16 पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-1 75
17 पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-2 104
18 मागासवर्गीय वस्‍तीगृहे 200
1 मालगुजारी तलाव 106
2 पाझर तलाव 62
3 सिंचन तलाव 109
4 को.प.बंधारे 58
5 गाव तलाव 31
6 लागवडीलायक क्षेत्र 7,73,800 हे
7 खरीप पिकाखालील क्षेत्र 7,22,000 हे
8 रब्‍बी पिकाखालील क्षेत्र 136300 हे
9 विहीरींची संख्‍या 69766
10 सिंचनाखालील क्षेत्र 97332 हे
11 सिंचना खालील क्षेत्राची टक्‍केवारी 12 %
12 शेतकरी संख्‍या 565463
13 अल्‍प भूधारक शेतकरी 144040
14 अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी 154453
15 सरासरी जमिन धारणा 1.37 हे
16 सरासरी पर्जन्‍मान 954.38 मि.मि

 

नांदेड जिल्‍हातील तालुका निहाय जिल्‍हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्‍यांची माहिती

अ.क्र. तालुका महसूली गावे जिल्हा परिषद सदस्य संख्या पंचायत समिती सदस्य संख्या ग्रा. पं. ची संख्या ग्रा. पं. सदस्य संख्या
1 नांदेड 85 4 8 73 590
2 मुदखेड 53 2 4 50 387
3 अर्धापुर 56 2 4 50 323
4 भोकर 82 3 6 66 510
5 उमरी 66 2 4 58 432
6 हिमायतनगर 73 3 6 52 407
7 हदगाव 154 6 12 125 989
8 माहुर 93 2 4 62 1010
9 किनवट 189 5 10 134 927
10 लोहा 125 6 12 118 702
11 कंधार 127 6 12 116 332
12 मुखेड 151 6 12 127 914
13 देगलुर 115 5 10 90 1010
14 नायगाव 91 5 10 81 583
15 बिलोली 89 4 8 73 470
16 धर्माबाद 54 2 4 45 678
एकुण 1603 63 126 1309 10264