जवाहर विहिर योजना
रोजगार हमी योजनेचे अतर्गत सन 1999-2000 या वर्षापासुन ते सन 2007-2008 चे मंजुर केल्याप्रमाणे या वर्षाचे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग अंतर्गत जवाहर विहित योजनेची वैचक्तीक लाभार्थीची निवड शासन नियमाप्रमाणे करुन लाभार्थ्यांना झालेल्या कामाच्या मुल्यांकनानुसार 100% अनुदान म्हणुन देण्यात येते त्यात कुशल भागासाठी 50% रक्कम व अकुशल भागासाठी 50% रक्कम वाटप करण्यात येते, सदर लाभार्थ्याची निवड स्थानिक आमदार यांनी शिफारस केल्यानुसार माननीय पालकमंत्री यांचेकडुन निवउ यादी शासनाचे निकषानुसार अंतिम करण्यात येते, त्यात नाबार्ड लाभार्थी 40% अल्पभुधारक 40% व मागासवर्गीय 20% प्रमाणे निवड यादी तयार करण्यात येते.
सुरुवातीला 45000/- रु अनुदान प्रत्येक लाभार्थी विहिरीसाठी शासनाने मंजुर केले होते. त्यांनतर 60000/- व 2007-08 या वर्षी रु 1.00 लक्ष शासनाकडुन देण्यात येतात. वर्ष 2007-08 या वर्षाचे मंजुर झालेले लाभीर्थीचे झालेल्या कामाचे मुल्यांकनानुसार अनुदान वाटप केले आहे. आता गेल्या दोन वर्षापासुन शासनाकडुन निधी उपलब्ध झाल्या नसल्याने उर्वरीत लाभार्थीचे अनुदान वाटप प्रलंबित आहे. निधी प्राप्त होताच मुल्यांकनानुसार निध्ीा वाटप करण्यात येईल.
दि. 30 जुन 2013 अखेर सदर जवाहर विहिर यारेजना रद्द समजण्यात यावी असे शासनाने कळविले आहे. त्याऐवजी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतुन वैयक्तीक लाभ योजने अंतर्गत सिंचन विहिरीची कामे मंजुर करण्यात येत आहेत व त्यानुसार प्रत्येक विहिरीचे साधारणतः रु. 3.00 लख एवढे अनुदान मजुर करण्यात येत आहे.
कार्यकारी अभियंता (लपा)
जिल्हा परिषद नांदेड