योजना

-: संचालन व प्रशासन :-

कृषि योजना राबविण्यासाठी प्रशासनाचे जबाबदार म्हण्‌न कृषि विकास अधिकारी,वर्ग-1 यांच्याकडे जबाबदारी असून त्यांच्या मदतीस जिल्हा कृषि अधिकारी(सा.),जिल्हा कृषि अधिकारी(विघयो) व मोहिम अधिकारी वर्ग-2 असे तीन राजपर्त्रित दर्जाचे अधिकारी शासनाने नेमलेले आहेत.तालुका स्तरावर कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि)असे वर्ग-3 दजाचे कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यांच्या मार्फत विभागाच्या विविध योजनांची अमलबजावणी करण्यात येते.

(1)विभागाचे उददीष्ट :-

1.जिल्हयास प्राप्त होणारी रा.खते,बियाणे व औषधी यांचे गुणनियंत्रण करणे व सदर निविष्ठांची उपलब्धता वेळेवर व योग्य दरात शेतक-यांना करून देणे.

2.जिल्हयातील पिक,पेरणी व पाउस यांची माहिती संकलीत करणे.

3.शेतक-यांसाठी विविध योजना राबविणे उदा.-विशेष घटक योजना,आदिवासी,अनु.जाती व जमाती उपयोजना व कृषि यांत्रिकीकरण इ.

4.निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत शेतक-यांच्या तक्रारींची नोंद घेउन आवश्यक त्या कार्यवाही करणे.

5.विविध केंद्ग पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सुधरीत कृषि औजारांचे शेतक-यांना अनुदानावर वाटप करणे.

(2) विभागामार्फत सुरु असणारी ठळक कामे,योजना याबाबत संक्षिप्त माहिती

  • गुणवत्ता नियंत्रण :- खते,बियाणे व किटकनाशके यांचे निविष्ठा केंद्गातून नमुने घेणे व प्रयोगशाळेस विश्लेषणासाठी पाठविणे व नमुने अप्रमाणीत असल्यास कोर्ट कार्यवाही करणे.उच्च प्रतीच्या निविष्ठा शेतकर्‍यास मिळतील या बाबत नियंत्रण ठेवणे.
  • बियाणे व रासायनिक खताची उपलब्धता :- खरीप व रबी हंगामापुर्वी बियाणे व खताची जिल्हयाच्या गरजेनुसार मागणी बियाणे महामंडळ व कृषि आयुक्तालयाकडे नोंदवून जिल्हयातील शेतकर्‍यास बियाणे व रासायनिक खताची उपलब्धता करून देणे.
  • अनु.जाती/अनु.जमाती उपयोजना:-दारिद्गय रेषेखालील अनु.जाती/अनु.जमातीच्या शेतकर्‍यांची मागदर्शक सुचनेनुसार निवड करून त्यांना विहीर/मोटार/कृषि औजारे / बैलजोडी/बैलगाडी ई.बाबीवर अनुदान देउन शेती उत्पादनात वाढ करणे व पर्यायाने आर्थिक स्तर उंचावणे.
  • परवाने देणे :-जिल्हयात खत ,बियाणे,औषधी योग्य गुणवत्तेचे व योग्य दरात विक्री करणेसाठी खत,बियाणे,औषधी ठोक व किरकोळ विक्री परवाने निर्गमित करणे.
  • कृषि यांत्रिकीकरण :- शेती उपयोगी विविध औजारे शेतकर्‍यास अनुदानावर उपलब्ध करून देणे.